|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लालूंच्या शिक्षेवर आज सुनावणी

लालूंच्या शिक्षेवर आज सुनावणी 

रांची / वृत्तसंस्था

चारा घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि इतर दोषींना गुरुवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे. बुधवारी होणारी शिक्षेची सुनावणी रांचीमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुढे ढकलली. लालूप्रसाद यादव शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले. मात्र आपली प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे अंतिम निकाल पुढे ढकलण्यात आला.

चारा घोटाळय़ातील एका प्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादव यांना शिक्षेची सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात लालूंसह 15 दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. रघुवंश प्रसाद सिंग, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि मनोज झा हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने लालूंना होणाऱया शिक्षेची सुनावणी ही महत्त्वाची घटना आहे. लालूप्रसाद यादव सध्या रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. लालूंना न्यायालय काय शिक्षा सुनावली जाणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: