|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘तरुण भारत’वरील हल्लेखोरांची गय करणार नाही

‘तरुण भारत’वरील हल्लेखोरांची गय करणार नाही 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

 समाजकंटकांनी ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. येथील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून तातडीने हल्लेखोऱयांचा शोध घेतला जाईल. यामध्ये दोषींची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषधार्थ बुधवारी कोल्हापुरात पुकारलेल्या बंद वेळी काही समाजकंटकांनी ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले. कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध सर्व क्षेत्रातून होत आहे. विविध पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी कार्यालयाला भेट देऊन दगडफेकीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी ‘तरुण भारत’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, पोलीस मुख्यालयातून कोल्हापुरात झालेल्या घटनेची माहिती घेतली आहे. ‘तरुण भारत’ कार्यालयावर झालेल्या हल्ल्यावेळचे सीसीटिव्ही फुटेज असल्यास पोलीसांना देण्यात यावे. हल्ला करणाऱयांना पकडण्य़ासाठी हे उपयोगी होणार आहे. हल्ल्यातील कुणाचीही गय करणार नाही. शहरातील संपूर्ण घटनेतील दोषींना जास्तीत जास्त कारवाई होण्यासाठी सबळ पुरावे न्यायलायात सादर केले जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. नागरीकांनीही शहरातील दगडफेकीचे मोबाईलवर केलेले छायाचित्रण पोलीसांना द्यावे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. दलित संघटनेच्या नेत्यांनी शातंतेत मोर्चा काढू, असा शब्द दिला होता. मात्र, हा शब्द त्यांनी पाळला नसल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

 कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, 51-S या कायद्यामध्ये नुकतेच सुधारणा झाली आहे. या कायद्यानुसार संबंधितांकडून नुकसानीची संपूर्ण भरपाई वसूल करण्याची तरतूद आहे. या कायदाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

  ‘तरुण भारत’चे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक जयसिंग पाटील यांनी पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायद्यानुसार ‘तरुण भारत’ कार्यालयवरील हल्ला करणाऱया समाजकंटकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार एन.डी. पाटील यांनी हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानची भरपाई देण्यात यावी. तसेच ‘तरुण भारत’चे छायचित्रकार शशिकांत मोरे हे सीपीआर चौकामध्ये छायचित्रण करताना जखमी झाले असून त्यांनाही शासकिय पातळीवर मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार अमल महाडिक, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘तरुण भारत’चे प्रशासनाधिकारी राहूल शिंदे, जाहिरात  प्रमुख (ग्रामिण) आनंद साजणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विजय जाधव, बजरंग दलाचे संभाजी साळोखे, युवा सेनेचे हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

Related posts: