|Monday, August 19, 2019
You are here: Home » उद्योग » वैश्विक कर्ज 233 लाख कोटी डॉलर्सवर

वैश्विक कर्ज 233 लाख कोटी डॉलर्सवर 

वॉशिंग्टन

  आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज 233 लाख कोटी डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. 2016 च्या नंतर यात 16 लाख कोटी डॉलर्सने वाढ नोंदविण्यात आली असे इन्स्टिटय़ूट ऑफ इन्टरनॅशनल फायनान्सकडून सांगण्यात आले. कॅनडा, फ्रान्स, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि टर्की या देशांत खासगी विना आर्थिक क्षेत्रातील कर्ज उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

या कालावधीत कर्जामुळे देशातील उत्पादन सलग चौथ्या तिमाहीत घसरण आहे. देशातील उत्पादन आणि आर्थिक विकास यांचा रेशो 318 टक्क्यांवर पोहोचला असून 2016 च्या तिमाहीच्या तुलनेत हा 3 टक्क्यांनी कमी आहे. चीन, टर्कीमधील वाढती महागाई, आर्थिक वाढ, चीन आणि कॅनडामध्ये कर्जात होणारी वाढ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात येत असल्याने त्याचा कर्जावर परिणाम दिसून येईल. सरकार आणि अनेक संस्थांच्या कर्जात वाढ होत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले होते.