|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबईच्या चेतना महाविद्यालयाची ‘बंधुआ’ प्रथम

मुंबईच्या चेतना महाविद्यालयाची ‘बंधुआ’ प्रथम 

कुडाळच्या निर्मिती थिएटर्सच्या एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

सांगलीची ‘तेरे मेरे सपने’ द्वितीय : मुंबईच्या अंतरंग थिएटर्सची ‘पोलखोल’ तृतीय

वार्ताहर / कुडाळ:

कुडाळ येथील निर्मिती थिएटर्स आयोजित नाटय़ कलाकार विजय कुडाळकर व उमेश पावसकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मुंबई येथील चेतना महाविद्यालयाच्या ‘बंधुआ’ने प्रथम, सांगली येथील श्री भगवती क्रिएशनच्या ‘तेरे मेरे सपने’ने द्वितीय, मुंबईच्या अंतरंग थिएटर्सच्या ‘पोलखोल’ने तृतीय, तर उत्तेजनार्थ प्रथम गणेशगुळे येथील चतुरंग प्रॉडक्शनच्या ‘रसिक’ने व द्वितीय पुणे येथील संक्रमणच्या ‘एकूट समूह’ने मिळविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी रात्री येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्पर्धेचा निकालतांत्रिक अंग : 1. बंधुआ, 2. तेरेमेरे सपने, 3. मेड फॉर इच अदर (आई फाऊंडेशन, सिंधुदुर्ग), अभिनय : स्त्राr : 1. कविता गडकरी (तेरे मेरे सपने), 2. पूजा सावंत (रसिक), 3. सिद्धी गुंफेकर (एकूट समूह), उत्तेजनार्थ 1. किर्ती चव्हाण (शेवटचा प्रवेश, वक्रतुंड थिएटर्सनेरुर), 2. निकिता सावंत (सुमा, चंद्रभागा थिएटर्स, कणकवली), पुरुष : 1. सत्येंद जाधव (सुमा), 2. रुपेश नेवगी (मेड फॉर इच अदर), 3. सुनील मळेकर (चतुर्थी, व्हय़ू फाऊंडर थिएटर्स, मुंबई), उत्तेजनार्थ 1. स्वप्नील धनावडे (अर्थवॉर्म, रसिक रंगभूमी, रत्नागिरी), 2. अमोल मेस्त्राr (शेवटचा प्रवेश), दिग्दर्शन : 1. अमेय परब (बंधुआ), 2. यशोधन गडकरी (तेरेमेरे सपने), 3. रोहन पेडणेकर (पोलखोल).

बक्षीस वितरणप्रसंगी जि. . सदस्य अमरसेन सावंत, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंदू शिरसाट, डॉ. जी. एस. कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते राजन नाईक, परीक्षक संदीप देशपांडे, अनघा देशपांडे, बंडय़ा सावंत, सुभाष सावंतप्रभावळकर, बाळा राऊळ, शरद परब, नीलेश जोशी, अजय सावंत आदी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी धोंडू रेडकर (गुरुजी), सुहास खानोलकर, महेश कुडाळकर, श्रीकृष्ण कुंटे, सुरेश राऊळ, नित्यानंद जडये, देवेंद्र परब, नंदू गावडे, नागेश नेमळेकर, नागेश नाईक, अनिल सावंत, पपू स्वार, विपुल धुरी, प्रवीण वेंगुर्लेकर, ओंकार मडवळ, अमोल बांदेकर, मिलिंद बावकर, आशिष कुडाळकर, सचिन कोंडसकर, वैभव तोटकेकर, प्रमोद कोलेकर, हरिश्चंद्र गोलेकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन महेश कुंभार यांनी केले, तर आभार दीपक राऊळ यांनी मानले.