|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आरळगुंडी येथील शेतकऱयाची कर्जास कंटाळून आत्महत्या

आरळगुंडी येथील शेतकऱयाची कर्जास कंटाळून आत्महत्या 

 

वार्ताहर/ पिंपळगाव

  भुदरगड तालुक्मयातील आरळगुंडी येथील विजय गोपाळ पाटील (वय 47) या शेतकऱयांने शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्याने गरीबीस व कर्जास कंटाळून नैराश्यपोटी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याच्या मृत्यूमुळे दोन मुले अनाथ बनली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मयत विजय पाटील याच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी ब्लड कॅन्सरने मृत्यू झाला आहे. पत्नीच्या उपचारासाठी त्याने आठ ते दहा लाख रुपये खर्च केले होते. हे सर्व पैसे त्याने नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सेवा संस्था तसेच बँक या माध्यमातून जमा करून खर्च केले होते. एवढे पैसे उपचारासाठी खर्च करूनही पत्नीचा मृत्यू झाल्याने तो हवालदिल झाला होता. त्याच्या आईवडिलांचाही मृत्यू झाला असून एक भाऊ मुंबईत राहतो. त्यास दोन मुलगे असून मोठा मुलगा प्रथमेश हा आरळगुंडी येथेच वडिलांसोबत राहून नववीच्या वर्गात शिकत आहे तर लहान मुलगा तुषार हा तिसरीच्या वर्गात शिकत असून त्यांस चुलत्याने मुंबईत आपल्यासोबत नेले होते.

  मयत विजय याची एक एकरभर इतकी शेती आहे. माळरानाची शेती असल्याने भात पिकांशिवाय दुसरे काहीच पिकत नाही. पत्नीच्या निधनास दोन वर्षे झाले तरी तो त्या धक्क्मयातून सावरला नव्हता. त्यामुळे तो घरीच राहून मिळेल ते खाऊन दिवस घालवत होता तसेच वारंवार आजारपणामुळे उत्पन्नाचे दुसरे काही साधनही नव्हते. त्यातच त्याच्या नववीत शिकणाऱया मुलाची जेवणाची आभाळ निर्माण झाली होती. भातशेतीतून काहीच उत्पन्न मिळत नसल्याने पत्नीच्या उपचारासाठी हातउसने घेतलेले आठ ते दहा लाख रुपये कर्ज कसे फेडावयाचे या चिंतेने त्याला ग्रासले होते. तसे तो वारंवार ग्रामस्थ व नातेवाइकाजवळ सांगून मी जगून काय करू असे हताशपणे बोलत होता.

  आज सकाळी मुलगा प्रथमेश हा सकाळची शाळा असल्याने लवकर शाळेस गेला. मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर दारास आतून कडी असल्याचे लक्षात आले शेजारील ग्रामस्थांनी बराच वेळ हाका मारूनही दरवाजा उघडत नसल्याचे पाहून घराच्या खापऱया काढून आतमध्ये प्रवेश केला असता घराच्या तुळीस गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. तात्काळ ग्रामस्थांनी त्यास गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

  पत्नीच्या आजारपणासाठी काढलेले कर्ज आपण फेडू शकत नाही या विवंचनेतुन त्याने मृत्यूस कवटाळल्याने त्याच्या पश्चात असलेली दोन मुले पोरकी झाली असून   त्यांचेवर आभाळ कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस पाटील महादेव गुरव यांनी वर्दी दिली असून भुदरगड पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 

Related posts: