|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » सारा तेंडुलकरला फोनवरुन त्रास देणाऱयास अटक

सारा तेंडुलकरला फोनवरुन त्रास देणाऱयास अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱया तरुणास मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

देव कुमार मैती असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सारा तेंडुलकरच्या घरी मागील काही दिवसांपासून फोन करत होता. फोनवरुन तो तीच्याशी लग्न लावून देण्याची आणि अपहरणाची धमकी देत होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान, आरोपीने पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधून येथून साराला फोन केल्याचे उघड झाले. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने मैती यास मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपीला पुढील चौकशीसाठी मुंबईला आणण्यात येणार आहे.