|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवारे येथील बाळुमामा मंदिरात चोरी

शिवारे येथील बाळुमामा मंदिरात चोरी 

वार्ताहर / वारणा कापशी

  शिवारे (ता. शाहुवाडी) येथे असणाऱया श्री संत बाळुमामा मंदिरामध्ये काल रात्री 2 च्या सुमारास चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी निर्दशनास आले.

  मंदिरातील लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून चोरटय़ांनी मंदिराच्या मुख्य गाभाऱयात प्रवेश केला. बाळुमामा मुर्तीवर असणारे सोन्याचे व चांदीचे दागीने व लहान मुर्ती चोरटय़ांनी लंपास केल्या. त्याशिवाय मंदिरातील दानपेटी फोडून त्यामध्ये असणारी रोख रक्कम चोरीस गेली. सोन्याचांदीच्या दागिन्यासह दानपेटीतील रोख रक्कम अशी एकूण अंदाजे 35 ते 40 हजार रुपयांची चोरी झाली.

चोरटयांनी चोरी करताना तोंडाला मास्क बांधलेले होते. हे मंदिरात असणाऱया सी.सी. टि.व्ही.कॅमेऱयामध्ये दिसून येत आहे. चोरी करतानाचे काही फुटेजही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱयामध्ये कैद झालेले आहेत. गुन्हय़ाची नोंद शाहुवाडी पोलिसात झाली आहे.

Related posts: