|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अलीगढ विद्यापीठाचा विद्यार्थी दहशतवादी संघटनेत सामील

अलीगढ विद्यापीठाचा विद्यार्थी दहशतवादी संघटनेत सामील 

अलीगढ :

अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्याचे नाव मन्नान वानी असून त्याच्या वसतिगृहात छापे टाकत पोलिसांनी अनेक गोष्टी हस्तगत केल्या आहेत. मन्नानचे एके-47 रायफलसोबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. मन्नान वानी अलीगढ विद्यापीठात अप्लाइड जियोलॉजीत पीएचडी करत होता. 2 जानेवारीपर्यंत तो विद्यापीठात उपस्थित होता. मन्नान हा दक्षिण काश्मिरातील कुपवाडा जिल्हय़ातील लोलाबचा रहिवासी आहे. अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने संशयाच्या आधारावर मनान वानीला निलंबित केले आहे.

 मन्नानसोबत वसतिगृहात राहणार मुजम्मिल मागील 4 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी दिली.