|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारात विक्रमी पातळी गाठण्याचे सत्र कायम

बाजारात विक्रमी पातळी गाठण्याचे सत्र कायम 

बीएसईचा सेन्सेक्स 90, एनएसईचा निफ्टी 13 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

बाजारात प्रत्येक सत्रात नवीन तेजी गाठण्याची परंपरा चालू वर्षात कायम आहे. मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकावर पोहोचत बंद झाले. दिवसभर बाजारात चढ उतार दिसून आला, मात्र शेवटच्या अर्ध्या तासात बाजारात तेजी आल्याने निफ्टीने 10,659 आणि सेन्सेक्सने 34,448 या उच्चांकावर मजल गाठली होती.

बीएसईचा सेन्सेक्स 90 अंशाने वधारत 34,443 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 13 अंशाच्या मजबूतीने 10,637 वर स्थिरावला. बँक निफ्टी 0.1 टक्क्यांनी वधारत 25,704 वर बंद झाला.

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात सुस्ती दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.1 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीने बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

एफएमसीजी, रियल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी झाल्याने बाजारात तेजी आली होती. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बीएसईचा रियल्टी निर्देशांक 3 टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.8 टक्क्यांनी मजबूत झाला. वाहन, मीडिया, धातू, औषध, पीएसयू बँक, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागात दबाव आला होता.

दिग्गज समभागांची कामगिरी

कोल इंडिया, येस बँक, विप्रो, आयटीसी, रिलायन्स इन्डस्ट्रीज 5.8-1.3 टक्क्यांनी वधारले. जी एन्टरटेनमेन्ट, आयशर मोटर्स, भारती इन्फ्राटेल, भेल, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, हीरो मोटो, सन फार्मा 2.3-0.9 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात टोरेन्ट पॉवर, ओबेरॉय रियल्टी, अशोक लेलँड, बर्जर पेन्ट्स, सीजी कंज्युमर 2-1.2 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स पॉवर, जीएमआर इन्फ्रा, रिलायन्स कम्युनिकेशन्स, वॉकहार्ट, जिंदाल स्टील 6.6-3.1 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅपमध्ये कॉफी डे, इन्फिनाईट कम्प्युटर, सुब्रोस, क्विक हिल, तानला सोल्युशन्स 20-14.7 टक्क्यांनी मजबूत झाले. जयप्रकाश असोसिएट्स, नागार्जुना फर्टिलायजर्स, रॉयल ऑर्किड, जेपी इन्फ्रा, एनटीएनएल 7.1-5.25 टक्क्यांनी घसरले.