|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सुवर्ण मंदिरसाठी साडे पाचशे किलो चांदी

सुवर्ण मंदिरसाठी साडे पाचशे किलो चांदी 

प्रतिनिधी/ सोलापूर

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांचे ‘सूवर्ण मंदिर’ निर्माणाचे काम सुरू झाले असून, येत्या दीड वर्षात मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होणार आहे. या सुवर्ण मंदिरसाठी आतापर्यंत 450 किलो चांदी व 950 ग्रॅम सोने दान स्वरूपात मिळाले आहे, अशी माहिती सिद्धेश्वर मंदिर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी  पत्रकाराशी बोलताना दिली.

शिवयोगी श्री सिद्धेश्वर यांच्या यात्रेला 12 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यासाठी झालेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी यात्रा मध्यवर्ती समितीचे प्रमुख रामकृष्ण नष्टे, जागा वाटप प्रमुख बाळासाहेब भोगडे, मिरवणूक प्रमुख मल्लिनाथ जोडभावी, रंग व विद्युत रोषणाई प्रमुख गिरीष गोरनळ्ळी, पशुप्रदर्शन व विक्री प्रमुख काशिनाथ दर्गोपाटील, शोभेचे दारुकाम प्रमुख मल्लिकार्जुन कळके, प्रसाद वाटप प्रमुख सिद्धेश्वर बमणी, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख ऍड. रेवणसिद्धप्पा पाटील आणि कृषी प्रदर्शन प्रमुख महादेव चाकोते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी काडादी म्हणाले, गेल्या नऊशे वर्षापासून सिद्धेश्वर यात्रा निघत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून तब्बल तीन ते चार लाखहून अधिक भक्त यात्राकाळात दर्शनासाठी येतात. यंदाची ही यात्रा 12 जानेवारीपासून सुरू होणार असून 16 जानेवारीपर्यंत होणाऱया सर्व धार्मिक विधीची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रे दरम्यान होणाऱया विविध कार्यक्रमाची समितीही बनविण्यात आली असून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नंदीध्वजांचे मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली असून यासाठीच्या योग्य त्या सूचनाही करण्यात आलेल्या आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झालेले आहे. काही ठिकाणी किरकोळ काम बाकी आहे परंतु 12 जानेवारीपूर्वी हे कामही पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास एक कोटी रूपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आली आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधितांना नुकसान भरपाई देता येणार आहे. तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृहे व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चोरी व मारामारी अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी सीसीटिव्हीची करडी नजर असणार आहे असेही काडादी म्हणाले.

सूवर्ण मंदिरासाठी भरघोस मदत

येत्या दीड वर्षात सूवर्ण सिद्धेश्वर मंदिराचे काम पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षभरापासून कामाला सुरूवात झाली आहे. सुवर्ण मंदिरासाठी 450 किलो चांदी, 950 ग्रॅम सोने, रोख रक्कम 4 कोटी 90 लाख असा निधी मिळाला आहे. मंदिर समितीने 100 किलो चांदी खरेदी केली आहे. मंदिरातील चांदीचा गाभाऱयाचे काम 40 टक्के पूर्ण झाले असून शेवटचा हात राहिलेला आहे. मंदिराचा कळस पूर्ण सोन्याचा बनविण्यात येणार आहे.

Related posts: