|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » न्यायालयीन आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच गुन्हा नोंदविणार

न्यायालयीन आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच गुन्हा नोंदविणार 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याचे माजी पोलीस महानिरीक्षक सुनीलकुमार गर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत अधिकृतरित्या मिळाल्यानंतरच गुन्हा नोंदविला जाईल, असे गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधीक्षक प्रियंका कश्यप यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आयजीपी गर्ग यांच्या विरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदवून घेतला जाणार आहे का असे त्यांना विचारला असता न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे ते हातात प्रत पडल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे आता पोलीस न्यायालयाकडे अर्ज करून प्रत मागणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

या निवाडय़ाला आव्हान देता येईल का यावर योग्यतो कायदा सल्ला घेतल्यानंतर गुन्हा नोंदवून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुन्नालाल हलवाई नामक तक्रारदाराला वास्कोतील एका वकिलाविरुद्ध गुन्हा नोंदवायचा होता त्या वकिलाविरुद्ध त्याने तक्रारही सदार केली नव्हती. दिलेली तक्रार नोंदवून न घेतल्यास न्यायालयात जाऊन आदेश मिळवला जाऊ शकतो याची कल्पना सदर तक्रारदाराला आहे.

आयजीपी विरुद्ध दिलेली तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याने ते न्यायालयात जाऊन आदेश मिळवू शकतात. तर एका वकिलाविरुद्ध दिलेले तक्रार नोंदवून घेतली गेली नाही तर त्यांनी न्यायालयात जाऊन आदेश का मिळवला नाही. पोलीस महानिरीक्षकांकडे कथित मध्यस्थ पाठवून साडेपाच लाखाची लाच देण्याचा प्रस्ताव का मांडला व प्रस्ताव मांडतानाच त्याचे ध्वनीमुद्रण का करण्यात आले. सदर तक्रार म्हणजे पूर्ण नियोजित नाटक तर नाही ना, याचा अभ्यास चालू होता. आता न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे त्याची पडताळणी करूनच गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.