|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » विजय मिळवूनही मुगुरुझाची माघार

विजय मिळवूनही मुगुरुझाची माघार 

वृत्तसंस्था/ सिडनी

विम्बल्डन चॅम्पियन गार्बिन मुगुरुझाने विजय मिळविल्यानंतरही सिडनी इंटरनॅशनल स्पर्धेतून माघार घेतली आहे. या वषीच्या सलग दुसऱया स्पर्धेत तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.

गेल्या आठवडय़ात ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील तिसऱया सेटवेळी तिच्या पायात गोळे आल्याने तिला माघार घ्यावी लागली होती. येथील सामन्यात तिने किकी बर्टेन्सचा 6-3, 7-6 (8-6) अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण नंतर तिने उजव्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने दारिया गॅव्हरिलोव्हाला पुढे चाल देण्यात आली. दारियाने नंतर सॅम स्टोसुरचा 6-4, 6-2 असा पराभव केला. पोलंडच्या ऍग्नीस्का रॅडवान्स्काने उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या कॅथरिन बेलिसचा 7-6 (7-4), 6-0 असा पराभव केला. तिची लढत कॅमिला जॉर्जीशी होईल. कॅमिलाने माजी विम्बल्डन विजेत्या पेत्र क्विटोव्हाचे आव्हान 7-6 (9-7), 6-2 असे संपुष्टात आणले.

पुरुष विभागात पावलो लॉरेन्झीने अग्रमानांकित अल्बर्ट रामोस विनोलासचा 6-3, 7-5, फॅबिओ फॉगनिनीने अलेक्झांडर डोल्गोपोलोव्हचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.

Related posts: