|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » सरिता, सोनिया उपांत्य फेरीत

सरिता, सोनिया उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था / रोहटक

माजी वर्ल्ड चॅम्पियन एल. सरिता देवी (60 किलो गट) व आशियाई रौप्यविजेती सोनिया लाथेर (57 किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरीत सहज विजय मिळवित राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

ऑल इंडिया पोलीसचे प्रतिनिधित्व करणाऱया सरिता देवीने अरुणाचल प्रदेशच्या ऍक्विलिया दुपकचा पहिल्याच फेरीत पराभव करून पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला. रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱया सोनियाने उत्तराखंडच्या कमला बिश्तचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अन्य नामवंतापैकी माजी कनि÷ वर्ल्ड चॅम्पियन निखात झरीनने 51 किलो वजन गटात छत्तीसगडच्या आभाचा पराभव करून सलग दुसरे पदक निश्चित केले. पवित्राने 60 किलो गटात मणिपूरच्या छावबा देवीचा, सर्जू बालाने 48 किलो गटात मध्यप्रदेशच्या दीपा कुमारीचा 5-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या शिक्षाला मात्र 54 किलो गटातील लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. तिला पंजाबच्या शविंदर कौर सिधूने हरविले.