|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपघातात दुचाकी चालक ठार

अपघातात दुचाकी चालक ठार 

प्रतिनिधी/ वाई

येथील वाई सुरुर रस्त्यावर शहाबाग फाटा येथे वाईकडून सुरुरकडे जात असतांना स्वप्निल उर्फ अमोल राजू उकरडे (वय 27 ) रा. ढवळेवाडी फुरसुंगी पुणे हा स. 7.30 वा. वाई कडून सुरुरकडे मोटारसायकलने जात असताना शहाबाग फाटय़ावर त्याची ट्रकशी धडक होवून तो डोक्यावर पडल्याने मेंदु बाहेर येवून जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेली सुषमा संपत वैराट (वय 18) रा. बोपर्डी †िहला कपाळाला व इतरत्र गंभीर मार लागलेने तिला मिशन हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे.

ट्रक हा सुरुरकडून वाईकडे चालक संतोष नामदेव गायकवाड वय 36 रा. पांचवड घेवून येत असताना त्याला मोटार सायकलची धडक बसली. ट्रक चालक संतोष गायकवाड विरुध्द गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

सुषमा वैराट ही महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी संघटनेचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांची पुतणी असून संबंधित मयत उकरडे त्यांचे गाडीवर चालकाचे काम करीत होता. गुह्याचा तपास सहा.पोलीस निरिक्षक बबनराव येडगे करित आहेत. 

 

Related posts: