|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुपर मार्केटमध्ये 88 हजारांची चोरी करणाऱया अधिकाऱयाला अटक

सुपर मार्केटमध्ये 88 हजारांची चोरी करणाऱया अधिकाऱयाला अटक 

प्रतिनिधी /मडगाव :

भाटी, गोवा वेल्ह येथील गोवन फुड्स या कंपनीत विक्री अधिकारी म्हणून काम करणाऱया एका अधिकाऱयाला कोलवा पोलिसांनी चोरीच्या आरोपावरुन अटक केली. चोरी करताना या अधिकाऱयाने आपला चेहरा झाकला होता. दवर्ली येथील प्रवीण गणपत पालकर (25) असे या अधिकाऱयाचे नाव आहे.

कोलवा येथील शोफाझ सुपर मार्केटमध्ये 9 जानेवारी 2018 रोजी ही चोरी झाली होती. दुसऱया दिवशी या चोरीसंबंधीची हकीकत पोलिसाना कळविण्यात आली होती.

या आस्थापनात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. चोरी करताना आपण या सीसीटीव्ही कॅमेऱयात अडकू नये यासाठी या आरोपीने आपला चेहरा झाकला होता. चेहरा झाकून आणि या सुपर मार्केटमध्ये कोणीही नसल्याचे पाहून या आरोपीने मेजाच्या खणातील 88,000 रुपये असलेली बॅग चोरुन नेली होती.

या चोरीची खबर कोलवा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसानी या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्हीची फुटेजची  अनेकदा पाहणी केल्यानंतर आणि सुपर मार्केटच्या इतर कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एक संशयित व्यक्ती पोलिसाच्या नजरेसमोर आली.

या संशयिताची पोलिसांनी चौकशी कोणी तेव्हा संशयित भाटी येथील गोवन फुड्स या कंपनीत नोकरीला असल्याचे समजले. पोलिसांनी योजना आखली आणि पाळत ठेवली. आपला पगार घेण्यासाठी संशयित या कारखान्यात आला असता कोलवा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद शिरोडकर व त्यांच्या सहकाऱयांनी या संशयिताला ताब्यात घेतले आणि कोलवा पोलीस स्थानकावर आणले.

त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा कोलवा येथील शोफाझ सुपर मार्केटमध्ये 88,000 रुपयांची चोरी आपणच केली होती अशी कबुली या संशयित आरोपीने दिली. त्यानंतर या आरोपीने दाखाविलेल्या जागेवरुन पोलिसानी ही रक्कम जप्त केली.