|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विजेच्या कामात सुरक्षेची तडजोड नको

विजेच्या कामात सुरक्षेची तडजोड नको 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 घराचे बांधकाम करताना नागरिक अनेक गोष्टा बारकाईने पाहतात. पण तेवढीच  बारकाई लाईट फिटींग-वायरिंग करताना दाखवत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज अपघाताला निमंत्रण मिळते. त्यामुळे विजेची कामे करताना सुरक्षा संदर्भात उपाय योजना कराव्यात तसेच गुणवत्तेशी व सुरक्षेशी तडजोड करु नये, असे आवाहन महावितरणचे कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता किशोर परदेशी यांनी केले.

  विद्युत निरीक्षक कार्यालय व कोल्हापूर जिल्हा विद्युत ठेकेदार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 17 जानेवारी दरम्यान ‘विद्युत सुरक्षा सप्ताहाचे’ आयोजन केले आहे. गुरुवारी ताराबाई पार्क येथील  विश्वेश्वरय्या सभागृहात विद्युत सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी महावितरणचे मुख्य अभियंता किशोर परदेशी होते. तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, विद्युत निरीक्षक एफ. एम. मुल्ला, महापारेषणचे अधीक्षक अभियंता ए. बी. दडमल, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, जिल्हा विद्युत ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राजेश चाळके प्रमुख उपस्थिती होते.

 याप्रसंगी बोलताना परदेशी म्हणाले, वीज वाहिन्यांचे जाळे सर्वव्यापी झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने वीज सुरक्षेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. वीज उपकरणे प्रमाणित व दर्जेदार असावीत. अर्थिंगचा वापर करावा. टू-पीन ऐवजी अर्थिंगची सुविधा असलेल्या थ्री-पीनचा वापर करावा. विद्युत ठेकेदार व अभियंत्यांनीही आपल्या क्षेत्रात होणाऱया कामावर वेळोवेळी पर्यवेक्षण करुन कामाचा दर्जा तपासावा. विद्युत वाहिन्यांमधील सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन याप्रसंगी परदेशी यांनी केले. कोल्हापूर जिह्यात वर्षभरात 60 प्राणांकित व 30 अप्राणांकित अपघात झाले, तर 160 आगीच्या घटना घडल्या. प्राणांकित 60 पैकी 15 अपघात केवळ नळाला पाण्याची मोटार लावताना झाले आहेत. अर्थिंगकडे दुर्लक्ष केल्याने हे अपघात घडले असल्याचे विद्युत निरीक्षक मुल्ला यांनी सांगितले. याप्रसंगी महावितरण व महापारेषणचे अभियंते तसेच विद्युत ठेकेदार संघटनेचे सर्व सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वसंत पाटील यांनी आभार मानले.

 

Related posts: