|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » ईडीकडून छापेमारी सूड भावनेतूनच : चिदंबरम्

ईडीकडून छापेमारी सूड भावनेतूनच : चिदंबरम् 

ऑनलाईन टीम / दिल्ली

ईडीने दिल्ली व चेन्नईतील घरांवर मारलेली छापेमारी सूड भावनेतूनच असल्याचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी म्हटले आहे.

पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहारामध्ये अनियमितता आढळल्याच्या कारणावरून ईडीने दिल्ली व चेन्नईतील घरी छापा टाकला. त्या वेळी पी. चिदंबरम् हेही घरी उपस्थित होते. छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काही लागले नाही. ही कार्यवाही फक्त सूडभावनेतून करण्यात आली. तसेच जोरबागमधील जो बंगला आहे, तो कार्तीचा नसून माझा आहे. एअरसेल-मॅक्सिस यांच्या व्यवहाराचा आणि ईडीने केलेल्या छापेमारीचा काहीही संबंध नसल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले.

 

Related posts: