|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा दहा गडय़ांनी विजय

भारताचा दहा गडय़ांनी विजय 

वृत्तसंस्था/ दुबई

येथे सुरू असलेल्या अंधांच्या पाचव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारताने बांगलादेशचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डीने शानदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 40 षटकांत 8 बाद 226 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 18.4 षटकांत बिनबाद 227 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला. भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डीने 60 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 101 तर सुनील रमेशने 57 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 105 धावा झळकविल्या. बांगलादेशच्या डावात कर्णधार अजय रेड्डीने 8 षटकांत 4 गडी बाद केले.