|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जनता गृहतारण संस्थेत सत्कार

जनता गृहतारण संस्थेत सत्कार 

प्रतिनिधी/ आजरा

विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा येथील जनता गृहतारण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे होते.

स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संजय दिवेकर यांचा तर इंग्रजी विषयात पी. एच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल नेसरी येथील कोलेकर महाविद्यालयातील डॉ. बी. आर. दिवेकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करून या सत्काराने आणखी जादा काम करण्याचे बळ मिळाल्याचे सांगितले.

यावेळी संचालक प्रा. बळवंत कडवाले, डॉ, तानाजी कावळे, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. मनोज देसाई, डॉ. सौ. अंजनी देशपांडे, प्रा. सौ. लता शेटे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, व्यवस्थापक मधुकर खवरे यांच्यासह संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. अशोक सादळे यांनी आभार मानले.

Related posts: