|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » धोंडीबाच्या शिनेमाच्या ध्यासाला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे कोंदण

धोंडीबाच्या शिनेमाच्या ध्यासाला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे कोंदण 

प्रकाश पुंभार / कोरेगाव

फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यातील आदर्की येथील धोडींबा कारंडे या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मोठय़ा कष्टाने आाणि हिमतीने सातारी मातीतल्या कलाकार आणि तंत्रज्ञांची मोठ बांधून ‘पळशीची पीटी’ या मराठी चित्रपटाची निमिर्ती केली. ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम केलेल्या धोंडी ते दिग्दर्शक धोंडीबा होण्याचा हा प्रवास खडतर आाणि संघर्षाचा राहिला. धोंडीबाच्या शिनेमाच्या ध्यासाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कोंदण लाभले असून पूर्णपणे साताऱयात तयार झालेला हा चित्रपट मकर संक्रांतीच्या गोड मुहुर्तावर पुणे फेस्टिवलमध्ये झळकला. सुमारे पन्नास चित्रपटातून ‘पळशीचा पीटी’  या चित्रपटाची पुणे फेस्टिवलला निवड झाल्याने धोंडीबा कारंडे यांच्यासह संपूर्ण टीमचा ध्यास सार्थकी लागला.

  पळशीची पीटी हा चित्रपट साकारला गेला. मात्र, यामागे आदर्की सारख्या गावातून सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या धोंडीबा कारंडे या युवकाच्या जिद्दी आणि मेहनतीची मोठी कथा आहे. कोणतेही  आर्थिक पाठबळ नसताना केवळ आपल्या स्वभाव गुणावर माणसे संघटीत केली, मिळेल ते काम करीत पै अन् पै जमवली आाणि चित्रपटाच्या ध्यासाला वाहुन घेतले. सुरुवातीला धोंडीबाने गावात जत्रेतल्या नाटकात काम केले. त्यानंतर पुढे देऊर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्यानंतर युवा महोत्सवातून अभिनयाची चुणूक दाखवली, त्यावेळी एकांकिका गाजवल्या. यामुळे  अभिनयाची गोडी लागली यातच पुढे नृत्यदिग्दर्शनात नशीब आजमावले यातून धिना धिन धा.. मध्ये यश मिळवले. त्यामुळे पुढे नृत्य दिग्दर्शनची कामे मिळु लागली. पुढे सातारच्या रायझिंग स्टार या ऍकडमी काम मिळवले याठिकाणी शिकवता-शिकवता पुन्हा ड्रामा या क्षेत्राकडे पावले वळली हा प्रवास सुरु असताना एका जागेवर स्थिरावेल तो धोंडीबा कसला पोटासाठी आणि कुटूंब चालवण्यासाठी अनेक व्यवसाय करुन पाहिले. मात्र, ध्यास होता तो चित्रपटाचा. सुरुवातीला काही लघुनाटिका, शॉर्टफिल्मस बनवल्या हाताला काम मिळाले. दरम्यान, साताऱयातल्याच नाटक अणि सिनेमाशी संबधित अनेक कलाकार तंत्रज्ञांबरोबर ओळख झाली, या ओळखीतून एक टीम पुढे आली या सर्वासमोर धोंडीबा कारंडेनी पळशीची पीटी या चित्रपटाचा विषय ठेवला आपल्या देशात क्रिडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकता नाही याला शासकीय धोरण जेवढे जबाबदार आहे, तेवढीच आपलीही अशावेळी ग्रामीण भागात तर शिक्षणाची पंचायत तेथे खेळाचे काय, तर पूर्णपणे वाटोळेच. यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक कसदार खेळाडु जिंकण्यापूर्वी हरत आहेत. अशा हरणाऱया प्रत्येक खेळाडूची व्यथा चित्रपटातून पुढे आणण्याचा विचार मांडला. याला सर्वांनी हातभार लावायचे ठरवले. तेजपाल वाघ, राजेंद्र संकपाळ, नवनाथ सकुंडे, जयदिप पिसाळ, निखिल गांधी, प्रा.बाळकृष्ण भोसले, रामभाऊ लेंभे अशा अनेकांनी मदत केली आाणि सुरु झाला पळशीच्या पीटीच्या निमिर्तीचा प्रवास या सिनेमाची सर्व तांत्रिक बाजू सातारमधल्या कलाकारांनी निभावली आहे. किरण ढाणे ही नवोदित कलाकार मुख्य भुमिकेत आहे. तसेच राहुल मगदुम, राहुल बेलापुरे, राजभुषण सहस्त्रबुध्दे, धोंडीबा कारंडे यांनी भूमिका केली आहे. संदीप जंगम यांनी छाया दिग्दर्शन आाणि संकलन, वेशभुषा राजेंद्र संकपाळ, डी.आय. निखिल गांधी, कला दिग्दर्शन अनिल वणवे, कार्यकारी निर्माता सुरज बाबर, संवाद तेजपाल वाघ, महेश मुंजाळे, पार्श्वसंगीत विनित देशपांडे, मेकअप प्रशांत इंगवले, रोहीणी शेंडगे, ध्वनी मयुर सकट, मिश्रण निमिष जोशी अशा अनेकांनी याचित्रपटासाठी येगदान दिले आहे. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण हे सातारसह भावेनगर, पिंपोडे, भाडळे, चिलेवाडी, कोरेगाव अशा ठिकाणी झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोकांनी उस्फूर्त सहकार्य केले. तसेच कलाकार, तंत्रज्ञ, स्थानिक, मित्रमंडळ यांच्या सहकार्यामुळे  चित्रपटाचे शिवधनुष्य उचलु शकलो, आहे असे धोंडीबा कारंडे सांगतात

Related posts: