|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » 26 जानेवारीला सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रह

26 जानेवारीला सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रह 

ऑनलाईन टीम / मुंबई

प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रह आयोजित करण्यात आले आहे. 26जानेवारीला मुंबईत मंत्रालयाजवळ आंबेडकर पुतळयापासून गेट वे वरिल शिवाजी महाराजांच्या पुतळयापर्यंत हा सत्याग्रह मार्च काढण्यात येणार आहे.

सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रहाच्या मोर्च्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,जेदयूचे माजी नेते शरद यादव, खासदार राजू शेट्टी, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, पाटीदार नेता हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार अल्पेश ठाकूर, दलित नेते आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील सहभागी होणार आहेत. लक्षणीय म्हणजे या सत्याग्रहामध्ये कॉग्रसचे नेते सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही चर्चा नाही. सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रह हे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून निघणार आहे.

Related posts: