|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » माझ एन्काऊंटर करण्याचा षडयंत्र ; प्रवीण तोगडियांचा आरोप

माझ एन्काऊंटर करण्याचा षडयंत्र ; प्रवीण तोगडियांचा आरोप 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद

सोमावारी पहाटेपासून अचानक बेपत्ता झालेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगाडिया हे तब्बल 12 तासांनी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर अहमदाबादमधील रूग्णालयात उपचार सुरू असून शुद्धीवर आल्यानंतर तोगाडिया यांनी पत्रकार परिषद घेत माझा एन्काऊंटर करण्याचा षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. तसेच पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले.

यावेळी बोलताना तोगडिया म्हणाले, ‘काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुने खटले काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला अटक करून एका तुरूंगातून दुसऱया तुरूंगात पाठवण्याचे काम गुजरातमधून सुरू झाले. हा माझा अवाज दाबवण्याचा प्रयत्न आहे. त्या परिस्थितीतही मी हिंदू संघटनेचे काम करत राहिल.

तसेच ‘एक माणूस अचानक माझ्या घरात घुसला. त्याने मला सांगितलं की तुमचा एन्काउंटर होणार आहे. आयबीच्या माध्यमातून मला घाबरवलं जात आहे. इतकं असूनही मी काल पोलिसांना सोडून रिक्षातून निघालो होतो. लोकेशन कळू नये म्हणून मी फोन स्वीच ऑफ केला होता. जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचं काही आठवत नाही, असे तोगडियांनी सांगितलं.

 

 

 

 

Related posts: