|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » शॉवरमधून शॉक उतरल्याने डॉक्टरचा मृत्यू

शॉवरमधून शॉक उतरल्याने डॉक्टरचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नाशिक

शॉवरमधून शॉक लागून डॉ.आशिष काकडे यांचा मृत्यू झाला आहे. गंगापूर रोडवरील इंद्रपस्थ सोसायटीत आशिष काकडे राहत होते. दुपारच्या वेळेस त्यांच्या घरातून पाणी बाहेर येत असल्याचे सोसायटीमध्ये राहणाऱया रहिवाशांना दिसून आले.

शेजारील रहिवाशांनी घरात जावून पाहिले असता डॉ.आशिष काकडे बाथरूममध्ये मृत अवस्थेत दिसून आले. त्यानंतर तातडीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून, शवविच्छेदनासाठी पाठविला असता. शवविच्छेदनामध्ये मृत्यूचे कारण हे शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ.आशिष काकडे यांचे मुळ गाव नंदूरबार मधील तळोदा हे आहे.