|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » हरयाणातही ‘पद्मावत’वर बंदी

हरयाणातही ‘पद्मावत’वर बंदी 

ऑनलाईन टीम / चंदीगड :

दीपिका पादुकोण,शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी या चित्रपटावर अनेक राज्यात बंदी घालण्यात आली आहे. गुजरात,मध्य प्रदेश, राज्यस्थानपाठोपाठ आता हरयाणातही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचे पद्मावती हे नाव बदलल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडचणी दूर झालेल्या नाहीत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे कारण देऊन हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.

 

Related posts: