|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपघातातील मृत पैलवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज वडूज येथे शोकसभा.

अपघातातील मृत पैलवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज वडूज येथे शोकसभा. 

वार्ताहर/ औंध

वांगी (ता. कडेगांव) येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात क्रांती कुस्ती संकुलातील पैलवान सौरभ माने (मालखेड ता. पराड), पै. शुभम घारगे (सोहोली ता. कडेगाव जि. शांगली), पै. विजय पाटील (रामापूर ता. कडेगाव जि. शांगली), पै. आकाश देसाई (काले ता. कराड जि.सातारा), पै. अविनाश गायकवाड फुफिरे ता.शिराळा जि. सांगली व गाडीचा ड्राइव्हर रणजीत धनवडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खटाव तालुक्यातील पैलवान, कुस्तीशौकीन आणि पंचायत समिती खटाव यांचे वतीने आज बुधवार दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता बचत सभागृह वडूज येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती पै. संदीप मांडवे यांनी केले आहे.

Related posts: