|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » 20 कोटींहून अधिक किंमतीच्या जुन्या नोटा जप्त

20 कोटींहून अधिक किंमतीच्या जुन्या नोटा जप्त 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला 14 महिने उलटून गेल्यानंतरही जुन्या नोटा सापडण्याचे सत्र सुरुच आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिलह्यामध्ये 20 कोटीहून अधिक किंमत असणाऱया जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

एका बिल्डर आणि कपडा व्यापाऱयाच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. यात जुन्या नोटा बदलून देणाऱयांचे रॅकेट असल्याचा संशय आहे. कानपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. एका पोलीस अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, एका बंद घरात मोठय़प् प्रमाणात जुन्या नोटा असल्याची माहिती कानपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून आधी 80 कोटीच्या नोटा जप्त केल्या. आता हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचला आहे.