|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » येरवडा कारागृहात निरागस सुरांची बरसात…

येरवडा कारागृहात निरागस सुरांची बरसात… 

शंकर महादेवन यांनी केले मंत्रमुग्ध

पुणे / प्रतिनिधी

सूर निरागस हो…गणनायकाय गणदैवताय…मन उधाण वाऱयाचे…यांसारखी एकाहून एक सरस गाणी सादर करत गायक शंकर महादेवन यांनी बुधवारी येरवडा कारागृहात सुरांची बरसात केली.

निमित्त होते येरवडा येथील कैद्यासाठी भोई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या प्रेरणा पथ या उपक्रमाचे. या वेळी प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, भूषणकुमार उपाध्याय, स्वाती साठय़े, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

महादेवन यांनी सर्वप्रथम सूर निरागस हो…मधून सूरांची बरसात केली. गण नायकाय गण देवताय..मधून त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यानंतर मन उधाण वाऱयाचे या गाण्यातून मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या गीतांना कैद्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कल हो ना हो, प्रीटी वूमन या गाण्यांनीही कैद्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर मितवा गाण्यात वादकांशी रंगलेली जुगलबंदी लक्षणीय ठरली. त्यांच्या ब्रेथलेस गाण्याने उच्चांक गाठला. सूनो गौर से दुनियवालो, हे गाणे त्यांनी कैद्यामध्ये येऊन सादर केल्याने कैद्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर मेरी माँ, या गाण्याने मैफलीचा समारोप केला.