|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’ चित्रपट सर्व राज्यात प्रदर्शित होणार : सुप्रिम कोर्ट

‘पद्मावत’ चित्रपट सर्व राज्यात प्रदर्शित होणार : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’चित्रपट सर्व राज्यांत प्रदर्शित होणार असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. ‘पद्मावत’सिनेमाच्या प्रदशर्नावर चार राज्यांनी बंदी घातल्याने या सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली .त्यावरील सुनावणीदरम्यान हा चित्रपट सर्व राज्यांत प्रदर्शित होणार असल्याचे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.त्यामुळे आता निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे.

सुरूवातीपासूनच या चित्रपटाला विरोध झाल्याने देशभरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत या चित्रपटाच्या नावासह अन्य काही बदल करण्यात आले. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजूरी दिली. त्यानंतर येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले मात्र राज्यसस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदशर्नावर बंदी घातली ,त्यानंतर आज सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत या बंदीला कोर्टाने स्थगिती देत हा सिनेमा सर्व राज्यांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ‘पद्मावत’चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Related posts: