|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » जम्मू- काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40 ठिकाणी गोळीबार केला. आरएसपुरा ते रामगढ सेक्टरपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार होत होता. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला.

 

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान सुरेश शहीद झाले. शिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत तीन पाकिस्तानी जवानांना ठार केले. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सने गुरुवारी रात्री पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक रेंजर्सने उखळी तोफांचा माराही केला. आर. एस. पुरा, अरनिया, रामगड, सांबा या भागांमधील बीएसएफच्या सुमारे 60 चौक्मयांना पाक रेंजर्सनी लक्ष्य केले. याचा फटका सीमेलगतच्या निवासी भागालाही बसला. आर. एस. पुरा सेक्टरमध्ये बचनोदेवी आणि सुनील कुमार या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला. तर चार जण यात जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत गोळीबार सुरुच होता. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवरील गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गावातील रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

Related posts: