|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » सोनई हत्याकांडप्रकरणी सहा दोषींना फाशी

सोनई हत्याकांडप्रकरणी सहा दोषींना फाशी 

ऑनलाईन टीम / अहमनगर :

2013 सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

जानेवारी 2013 मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26), सचिन घारू (वय 23) या दलित मेहतर समाजातील तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सचिन घारुचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि याच रागातून सहा ते सात जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील एका आरोपीला सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले. मात्र, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

 

Related posts: