|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नवीन राष्ट्रीय महामार्गांचे भूसंपादन प्रक्रिया जलद करा

नवीन राष्ट्रीय महामार्गांचे भूसंपादन प्रक्रिया जलद करा 

प्रतिनिधी/ सोलापूर

नवीन पाच राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांनी शनिवारी सह्याद्री अतिथीगृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवीन पाच महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व संबंधित अधिकाऱयांकडून आढावा घेतला. यावेळी सह्याद्री अतिथीगृहात (मुंबई) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम यांच्यासह केंद्रीय अधिकारी उपस्थित होते. तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वय अधिकारी प्रवीण साळुंके, उपअभियंता महेश येमुले आदी उपस्थित होते.

यावेळी सांगली-सोलापूर, अहमदनगर ते जेऊर, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत चर्चा केली. तसेच तुकाराम महाराज पालखी मार्ग (पाटस, बारामती, इंदापूर, अकलूज, माळखांबे, बोंडले), संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (मोहोळपासून वाखरी, खुडूस, धर्मपूरी) या कामाचाही आढावा घेण्यात आला. पाच नवीन राष्ट्रीय महामार्गाचे हे प्रकल्प आहेत. मोजणी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायची आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या नवीन रस्ते प्रकल्पामुळे सोलापूर जिह्याच्या दळण-वळणामध्ये सुलभता येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे मार्ग खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पालखी मार्गाचा विस्तार झाल्याने वारीतील भक्तगणांची मोठी सोय होणार आहे.

Related posts: