|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » ‘पद्मावत’च्या विरोधासाठी जवानांनो अन्नत्याग करा : करणी सेना

‘पद्मावत’च्या विरोधासाठी जवानांनो अन्नत्याग करा : करणी सेना 

ऑनलाईन टीम / जयपूर :

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ’पद्मावत’ सिनेमाला विरोध म्हणून लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकराना यांनी हे आवाहन केले आहे.

याबाबत बोलताना महिपाल सिंह म्हणाले, ‘सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱया जवानांनीही राणी पद्मावतीच्या प्रति÷sचं रक्षण करण्यासाठी पुढे यावं. तुमच्या बहिणींचा सन्मान आणि इभ्रतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हीही एका दिवसासाठी लष्करातील मेसच्या जेवणावर बहिष्कार टाकावा,’तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून्न जोशी यांनी हरयाणात पायही ठेवू नये,असा इशाराही त्यांनी दिला आहे. राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह कालवी यांनीही मकराना यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.