|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews »   आपच्या 20 आमदारांच्या अपात्रतेवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

  आपच्या 20 आमदारांच्या अपात्रतेवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले असून, त्यांना अपात्र ठरविण्यात आलेआहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसलाआहे. 

लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या 20 आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत 20 आमदारांना अपात्र ठरवले आहे. केंद्र सरकारनेही तात्काळ अधिसूचना जारी करून या आमदारांचेसदस्यत्व रद्दकेलेआहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातली शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. याचा दिल्लीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. 

Related posts: