|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘पॅडमॅन’चे मलालाने केले कौतुक, पाकिस्तानी संतप्त

‘पॅडमॅन’चे मलालाने केले कौतुक, पाकिस्तानी संतप्त 

लंडन

 नोबेल शांतता पुरस्कार विजेती पाकिस्तानमधील मलाला युसूफजईने अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’चे उघड समर्थन केले आहे. मलालाने द ऑक्सफर्ड युनियनदरम्यान अक्षयची पत्नी आणि चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्ना हिची भेट घेतली आहे. पॅडमॅन पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक असून चित्रपटाचा संदेश प्रेरणादायी असल्याचे तिने म्हटले. याशिवाय मलालाने ट्विंकल आणि पॅडमॅनच्या टीमसोबत एक छायाचित्र देखील काढून घेतले. परंतु पाकिस्तानातील अनेक समाजमाध्यम वापरकर्त्यांना हे छायाचित्र पचनी पडले नाही. भारतीय चित्रपटाचा प्रचार करणे आणि हातात सॅनिटरी पॅड पकडून छायाचित्र काढण्यावरून पाकिस्तानींनी मलालावर टीका केली. मलालाने पाकिस्तानसाठी काहीच केलेले नाही. जर पाकिस्तानाबद्दल तिला प्रेम असेल तर तिने देशाची संस्कृती आणि चित्रपटांचा प्रसार करावा, असे एका वापरकर्त्याने म्हटले.  मलालाने हातात पॅड पकडणे, काही तालिबानींना हातात बंदूक पकडणे आणि तिच्या डोक्यात गोळी घालण्यापेक्षा अधिक धोकादायक वाटत असल्याची खोचक टीका त्याने केली.

Related posts: