|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘महानायक’चे प्रेक्षकांच्या मनावरील अधिराज्य कायम

‘महानायक’चे प्रेक्षकांच्या मनावरील अधिराज्य कायम 

पी.व्ही.आरमध्ये अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीव्हलला प्रारंभ

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  बच्चन वेडय़ांच्या अलोट गर्दीमध्ये डी.वाय.पी. सिटीमधील पी.व्ही.आर सिनेमाज्मध्ये गुरुवारी ‘अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीवल’ला उत्साहात प्रारंभ झाला. ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटास झालेली बच्चन प्रेमींची गर्दी पाहता बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या कायम असल्याचे दिसून आले.

  सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनानिमित्त डी.वाय.पी.सिटी, पी.व्ही.आर. सिनेमाज् आणि कोल्हापूरातील अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड व्हॉटस् ऍप गुप यांच्या संयुक्त विद्यमाने व डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूरातील अमिताभ प्रेमींसाठी फिल्म फेस्टीवल चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.संजय पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते केक कापून फेस्टीवलचे उदघाटन करण्यात आले. तसेच याप्रसंगी फेस्टीवलचे मुख्य आकर्षण असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या सेल्फी पॉईंटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.  

 अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकेतुन लोटस मेडिकल फाऊंडेशनच्या विशेष लहान मुलांसाठी तसेच मातोश्री वृध्दाश्रमातील लोकांसाठी ग्रुपच्या सदस्या स्मिता सावंत यांनी तब्बल 100 हून अधिक तिकीटे खरेदी करून त्यांना चित्रपट पाहण्याचा दुर्मिळ आनंद मिळाला.

  चित्रपट सुरु होण्यापुर्वी भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शो सुरू झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या एंट्रीला व सर्व डॉयलॉगना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या व शिट्टय़ांच्या गजरात भरभरून दाद दिली. अमिताभ यांचा हा भव्य दिव्य सुपरहिट  सिनेमा त्या काळात रसिकांनी उचलून धरला होता. तोच थरार व उत्साह संपुर्ण शोच्या दरम्यान प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.

  शिस्तबद्ध पद्धतीने अमिताभ बच्चन फिल्म फेस्टीवलचे आयोजन केल्याबद्दल डी.वाय.पी सिटीचे, पी.व्ही. आर सिनेमाज व कोल्हापूरातील अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांचे रसिक प्रेक्षकांनी कौतुक करून दाद दिली. याप्रसंगी डॉ संजय पाटील तसेच डी.वाय.पी सिटीचे सिध्दार्थ साळोखे,पी.व्ही.आर.चा अधिकारी वर्ग,अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड चे प्रमुख ऍड.इंद्रजित चव्हाण, आमदार सुजित मिणचेकर, अमरदिप पाटील, स्मिता सावंत, ऍड.सरिता भोसले, युवराज राणिंगा , नगरसेवक तौफिक मुलाणी, मिसेस महाराष्ट्र गौरी शिरोडकर तसेच अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.ङ

 

Related posts: