|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » एकबोटेचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

एकबोटेचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता 

ऑनलाईन टीम / पुणे :

भीमा कोरेगाव हिंसाचारात कट रचल्याचा आरोप असलेल्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे एकबोटेस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

एक जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर पसरलेले पहायला मिळाले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या हिंसाचारामागे समस्त हिंदू आघडीचे नेते मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांचा हात असल्याचा आरोप केला व त्यांना त्वरित अटक करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. यासंदर्भात एकबोटेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या पार्श्वभूमीवर पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत मिलिंद एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

 

Related posts: