|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » कॉल ड्रॉप कंपन्यांची समस्या

कॉल ड्रॉप कंपन्यांची समस्या 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कॉल ड्रॉपची समस्या वैयक्तिकरित्या दूरसंचार कंपन्यांबरोबर संबंधित आहे. पायाभूत सुविधांना आवश्यक ती मंजुरी देण्यात न आल्याने या क्षेत्रातील समस्या वाढत आहे. यामुळे संपूर्ण दूरसंचार क्षेत्राची ही समस्या असल्याचे म्हणणे योग्य नाही असे सीओएआयचे संचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटले. दूरसंचार विभागाने या प्रकरणी कंपन्यांना ही समस्या सोडविण्यास सांगितली आहे. दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन या लवकरच कॉलच्या गुणवत्तेसंदर्भात दूरसंचार कंपन्यांबरोबर चर्चा करतील असे सांगण्यात येत आहे.

काही कंपन्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या आहेत. काही कंपन्या गुंतवणूक करत नाहीत. अशा कंपनीच्या ग्राहकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही टॉवर बंद करण्यात येत आहेत आणि काहींची देखभाल करण्यात येत नाही. हे प्रश्न कंपन्यांबरोबर संबंधित असून दूरसंचार क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीचे चित्रण करण्यात येईल. काही कंपन्या दाखविण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत, असे त्यांनी म्हटले.