|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » दावोसमध्ये मोदींचा ‘न्यू इंडिया’चा नारा

दावोसमध्ये मोदींचा ‘न्यू इंडिया’चा नारा 

ऑनलाईन टीम / दावोस

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात चालू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यू इंडियाचा नारा दिला.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारतीय पंतप्रधान सहभागी होण्याची ही 20 वर्षातील पहिलीच वेळ आहे. नरेंद्र मोदांनी स्विर्त्झर्लंडच्या राष्ट्रपतींचीही भेट घेतली.

भारतीय वेळपद्धतीनुसार काल रात्री विशेष वेलकम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदींसह भारतीय व आंतराष्ट्रीय उद्योगातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. दुपारी चारच्या सुमारास मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली.

भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी त्यांनी विवेचन केले. तंत्रज्ञानामुळे देशाचे अर्थकारण बदलल्याचे सांगत त्यांनी न्यू इंडियाचा नारा दिला.