|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » सध्या आमचे युतीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : मुख्यमंत्री

सध्या आमचे युतीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टी बोलल्या आहेत.पण सध्या तरी आमची युती आहे आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल,असा विश्वास फडणवीस यांनी दावोस येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा ठराव एकमताने झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात यापुढे शिवसेना देशातील सर्व निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले. दावोसाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या या निणर्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरी मी यावर जास्त बोलणार नाही पण आमचे युतीचे सरकार सध्या आहे आणि हे सरकार पाच वर्षांचा आपला कालावधीही पूर्ण करेल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.