|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’ संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार

‘पद्मावत’ संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

‘पद्मावत’ सिनेमावर बंदी आणण्यासाठी राज्यस्थान व मध्यप्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.

सिनेमा प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे दोन्ही राज्यांनी म्हटले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जवाबदारी आहे, असे म्हणत राज्यस्थान व मध्यप्रदेश सरकारची याचिका फेटाळली. कोर्टाने सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश दिले, तरी तुम्ही पुन्हा कोर्टाकडे येता. संघटनांच्या धमक्या व हिंसेचा हवाला देत असाल, तर त्यावर आम्ही सुनावणी का करायची, असे खडेबोल सुनावत कोर्टाने राज्य सरकारला फटकारले.

Related posts: