|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / दावोस :

स्वित्झरलंडमधील दावोस शहरात चालू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासुदेव कुटुंबकमचा नारा दिला .तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच 1997च्या तुलनेत भारताचा विकास दर वाढल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘तंत्रज्ञानामुळे अर्थकरणाला वेगवान दिशा मिळाली.मात्र तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तसेच त्याची अव्हानही मोठी आहेत. डेटा जमा करण्याएवढेच डेटा जतन करण्याचे देखील अव्हान आहे. आज डाटा ही सर्वात मोठी संपत्ती बनली आहे .डाटाच्या ग्लोबल फ्लोमुळे सर्वाधिक संधी निर्माण होत आहे. जो डाटाच्या डोगरांवर नियंत्रण मिळवेल तोच भविष्यात मोठा होईल.’

दहशतवादाचा मुद्यावर मोदी म्हणाले, ‘दहशतवाद धोकादायक आहे पण जेव्हा चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असे म्हटले जाते,तेव्हा ते अधिक धोकादायक असते.अनेक समाज देश आज स्वयंकेंद्री होत आहेत. हाही दहशतवादी आणि वातावरण बदलाएवढाच मोठा धोका आहे. तसेच 2014मध्ये 30 वर्षात प्रथमच एखादय़ा पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले.आम्ही सर्वांच्या विकासाचे सत्र स्वीकारले आणि सबका साथ सबका विकास हा आमचा नारा असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

 

Related posts: