|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » चारा घोटाळा : चाईबासा प्रकरणात लालूंना 5 वर्षांचा कारावास

चारा घोटाळा : चाईबासा प्रकरणात लालूंना 5 वर्षांचा कारावास 

ऑनलाईन टीम / रांची :

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळयाशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळय़ाप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रूपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

चारा घोटाळय़ातील हे तिसरे प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. चायबासा घोटाळय़ाप्रकरणी न्यायालयाने 53 आरोपींपैकी 50जणांना दोषी ठरवले आहे. चाईबासा कोषागार प्रकरणी 12 डिसेंबर 2001 रोजी 76 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

 

 

 

 

 

Related posts: