|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » करणी सेना आक्रमक झाल्यानंतर मनसेचा युटर्न

करणी सेना आक्रमक झाल्यानंतर मनसेचा युटर्न 

महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळफासू असा इशारा दिला.

ऑनलाईन टीम / मुंबई

   करणी सेनेचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करत असताना मनसेने करणी सेनेच्या विरोधाला विरोध करत ‘पद्मावत’ला संरक्षण देणार असल्याचे मनसेच्या कार्याध्यक्षा  शालिनी ठाकरे यांनी जाहीर केले होते .मात्र, महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळफासू असा इशारा दिल्यानंतर मनसेने नेहमीप्रमाणे यूटर्न घेतला आहे.

 

   सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात  अडकलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शिन अवघ्या काही तासांवर आले आहे. मात्र देशभर या चित्रपटाच्या विरोधात करणी सेना आक्रमक झाली आहे. कोणत्याही क्षणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही करणी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘पद्मावत’ला संरक्षण देण्यास तयार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासांतच मनसेने हा आपला निर्णय मागे घेतल्याचे पहायला मिळाले.

   ‘पद्मावत’ चित्रपटाला मनसेकडून अजून कोणतीही भुमिका व्यक्त करण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात आदेश दिले, त्यामुळे हे सर्व जवाबदारी सरकारची आहे, सरकारने काय ते बघाव, मनसेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. अशी माहिती मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे.