|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’विरोधात नगरमध्ये रास्ता रोको

‘पद्मावत’विरोधात नगरमध्ये रास्ता रोको 

ऑनलाईन प्रतिनिधी / अहमदनगर 

   ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी नगर जिल्हय़ामधील कर्जत तालुक्मयातील राजपूत समाजाच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

   संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला असून, चित्रपटाचे नाव बदलल्यानंतरही विरोध सुरूच असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना नगरमध्ये त्याविरोधात बुधवारी आंदोलन करण्यात आले. चित्रपटात राजपूत समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, चुकीचा इतिहास दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्मयातील राजपूत समाजाच्या वतीने कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी…पदमावत फिल्म नही चलेगी…अशा घोषणा देत चित्रपटाला विरोध दर्शविण्यात आला. त्याचबरोबर चित्रपट दाखविल्यास राडा करण्याचा इशाराही देण्यात आला. मोर्चात चंदनसिंग परदेशी, बबनसिंग परदेशी यांच्यासह राजपूत समाजातील अनेक मंडळी मोठय़ा संख्येने सहभागी झाली. रास्ता रोको आंदोलन झाल्यावर कर्जत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजपूत समाजाच्या या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र फाळके, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.

Related posts: