|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » कडकोट पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित

कडकोट पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

त्संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतीक्षित ’पद्मावत’ सिनेमा अखेर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. इतिहासात छेडछाड केल्याचा आरोप करत राजपूत करणी सेनेकडून ’पद्मावत’ सिनेमाविरोधात तीव्र व हिंसक निदर्शनं देशभरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याचे एक आव्हान प्रशासनासमोर उभं राहिले आहे.देशभरात चित्रपटगृहाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्ता करण्यात आला असून मुंबईतून करणी सेनेचे 100 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहे.

राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणा-या चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, असे म्हटले. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमचे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व गोवामधील सदस्य ‘पद्मावत’चे प्रदर्शन करणार नाहीत, असे जाहीर केले. हरियाणातील गुरुग्राम येथील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, महाराष्‍ट्र, उत्तर प्रदेशातील सिनेमागृहांनाही संरक्षण पुरवण्यात आले आहे.

 

Related posts: