|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » दिल्लीत पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण, ड्रायव्हरवर गोळीबार

दिल्लीत पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण, ड्रायव्हरवर गोळीबार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीच्या विहारसारख्या हायप्रोफाईल परिसरातून सकाळी स्कूल बसमधून एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 26 जानेवारीनिमित्त शहरात कडक बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नर्सरीत शिकणारा हा मुलगा सकाळी साडे सात वाजता बहिणीसोबत शाळेसाठी निघाला होता. बसमध्ये जवळपास 15 ते 20 विद्यार्थी होते. दोन बाईकस्वारांनी बस ड्रायव्हरवर गोळी झाडली आणि बसमधील एका मुलाला घेऊन फरार झाले. अपहरणाची माहिती मिळताच परिसरात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांना अपघाताची माहिती मिळाली होती. ते धावतच घटनास्थळी पोहोचले तेव्हाच त्यांना अपहरणाची माहिती मिळाली. या बसमध्ये अपहरण झालेल्या मुलाची बहिणही होती. पण त्या व्यक्तींनी त्याच्या बहिणीला आणि इतर मुलांना काहीही केले नाही. केवळ त्याच मुलाला घेऊन ते फरार झाले. जखमी झालेल्या ड्रायव्हरला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

Related posts: