|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » मारुती सुझुकीच्या डिसेंबर अखेर 9 टक्क्यांनी विक्रीत वाढ

मारुती सुझुकीच्या डिसेंबर अखेर 9 टक्क्यांनी विक्रीत वाढ 

नवी दिल्ली :

मारुती सुझुकीच्या भारतातील सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार 3 टक्क्यांचा नफा झाला आहे. डिसेंबर अखेर तीन महिन्यात गाडय़ाची उच्चांकी विक्री झालेली असून मागील वर्षीही हीच परिस्थिती होती. भारतातील मोठय़ा कार उत्पादन क्षेत्रात सुझुकी 1 हजार 799 कोटी उत्पादनातील नफा असून त्याचे 22.1 टक्केवारी आहे. 30 हजार 37.8 कोटी विक्री झाली आहे.

दरम्यानच्या तीन महिन्यातील कालखंडात नोंदणीकृत कंपन्यांचा निव्वळ नफा हा 18 हजार 940 कोटी इतका असून त्याचा 13.9 टक्के इतका रेट आहे. त्याच कालावधीत (एमएसआय) एकूण 431 हजार 112 वाहनांची संख्या असून ती 13.3 टक्के प्रमाणात वाढ पहावयास मिळते. अशी परिस्थिती देशांतर्गत बाजारपेठेत 4 लाख 586 गाडय़ाची विक्री झाली. त्याचे 12.4 अशा टक्क्यांनी वाढ झालेली असून 30 हजार 526 गाडय़ांची निर्यात करण्यात आली आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2017 दरम्यान 1 लाख 317 हजार 801 वाहनांची विक्री झालेली असून नेंदणीकृत आकडेवारीनुसार 14.2 टक्के इतका दर गेल्या नऊ महिन्यात पहावयास मिळतो. देशांतर्गत बाजारपेठेत 1 लाख 226 हजार 418 इतकी विक्री झाली असून त्याची 15.5 इतकी टक्केवारी आहे. या कालावधीत 91 हजार 383 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

Related posts: