|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » परिवार वाढविण्यासाठी कैद्याला मिळाली सुटी

परिवार वाढविण्यासाठी कैद्याला मिळाली सुटी 

चेन्नई / वृत्तसंस्था :

मद्रास उच्च न्यायालयाने एका कैद्याला त्याचे कुटुंब वाढविण्यासाठी 2 आठवडय़ांची तात्पुरती सुटी मंजूर केली. हा कैदी तिरुनलवेली जिल्हय़ाच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी एका समितीची स्थापना केली जावा अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

न्यायाधीश एस. विमला देवी आणि टी. कृष्ण वल्ली यांच्या खंडपीठाने पलयमकोट्टई मध्यवर्ती तुरुंगातील कैदी सिद्दीक अली यांना ही सुटी त्यांच्या 32 वर्षीय पत्नीच्या याचिकेवर मंजूर करण्यात आली. त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कैद्यांना जीवनसोबतीसोबत राहणे आणि संबंध प्रस्थापित करण्याची मंजुरी देण्यावर विचार करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करावी. अने देशांमध्ये कैद्यांना असा अधिकार देण्यात आला आहे. संबंध प्रस्थापित करणे एक अधिकार असून तो विशेषाधिकार नसल्याचा उल्लेख असणाऱया प्रस्तावाला केंद्राने अगोदरच मंजुरी दिली आहे. काही देशांमध्ये कैद्यांच्या अशा अधिकाराला मान्यता देण्यात आली आहे.