|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फेसबुकने वृत्त प्रकाशकांना शुल्क द्यावे : मर्डोक

फेसबुकने वृत्त प्रकाशकांना शुल्क द्यावे : मर्डोक 

न्यूयॉर्क  / वृत्तसंस्था :

ऑनलाईन जाहिरातीच्या व्यवसायात फेसबुक आणि गुगलची हिस्सेदारी सर्वाधिक आहे. जर या कंपन्यांना  स्वतःच्या प्लॅटफॉर्म्सवर विश्वासार्ह आणि अचूक बातम्या हव्या असतील, तर त्यांनी वृत्ताच्या प्रकाशकांना शुल्क अदा करावे, अशी मागणी प्रसारमाध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी केली आहे. मर्डोक यांनी एका पत्राद्वारे प्रसारमाध्यम संघटना आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध करणाऱया फेसबुक आणि गुगल यासारख्या कंपन्यांदरम्यान नव्या परवाना व्यवहाराचा प्रस्ताव मांडला आहे.

फेसबुक आणि गुगलने स्वतःच्या अलगॉर्थमद्वारे खळबळजनक वृत्त देणाऱया संकेतस्थळांना प्रसिद्ध करत पैसे कमविले असले तरीही अशी संकेतस्थळे विश्वासार्ह वृत्त देत नाहीत. मार्क जुकेरबर्ग प्रामाणिक व्यक्ती असल्याबद्दल मला किंचित देखील संशय नाही. परंतु अशा प्लॅटफॉर्म्सवर पारदर्शकतेची मोठी कमतरता आहे. हा प्रकार प्रकाशकांसोबत राजकीय भेदभाव धोकादायक मानणाऱयांसाठी धोकादायक आहे, असे मर्डोक यांनी पत्रात नमूद केले.

इतर पद्धतींवर विचार करण्याची वेळ आली आहे. जर फेसबुक विश्वासार्ह प्रकाशकांना मान्यता देण्यास इच्छुक असेल तर त्याने वृत्तकंपन्यांना शुल्क द्यावे. याकरता केबल कंपन्याचे प्रारुप अवलंबिले जाऊ शकते असे ते म्हणाले.