|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बोंजुर्डी सरपंचपदी सौ. कल्पना पाटील बिनविरोध

बोंजुर्डी सरपंचपदी सौ. कल्पना पाटील बिनविरोध 

वार्ताहर /अडकूर :

बोंजुर्डी-मोरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. कल्पना आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी विशेष सभेची आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सौ. कल्पना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी बी. आय. देसाई, तलाठी कातकर, दीपक इंगवले, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर उपस्थित होते.